मार्केट सेस रद्द करण्यासाठी २ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी असहकार; पाच लाख व्यापारी आंदोलनात सहभागी होणार !

कोल्हापूर, कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून (एपीएमसी) बाजार समितीच्या आवारात आणि आवाराबाहेर आकारण्यात येणारा ‘मार्केट सेस’ तातडीने रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीने २ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी असहकार आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात राज्यातील सुमारे पाच लाख व्यापारी सहभागी होणार असून, “ना सेस भरून घेणार, ना सेस भरणार” अशी भूमिका व्यापाऱ्यांनी जाहीर केली आहे. मार्केट सेस रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा राज्यव्यापी व्यापारी परिषदेत देण्यात आला.

Leave a Comment