निफाडला सोना सिढी व वाढदिवस उत्साहात संपन्न !
निफाडला सोना सिढी व वाढदिवस उत्साहात संपन्न !
निफाड (नासिक) निफाड जैन श्रावक संघाचे मा. संघपती श्री.चंपालालजी चोरडिया व सौ.लिलाबाई चोरडिया यांच्या ९१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन चौथ्या पिढीतील सदस्य कु. हिमासी मधुर ऋतुजा चोरडिया हिच्या आगमनाने प्रथमच निफाडला सोन्याच्या सिढीचा कार्यक्रम स्वरा लाॅन्स येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री नवकार महामंत्राने करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण श्री दक्षित गादिया यांच्या गायनाने श्रोत्यांची मने जिंकली. पाहुण्यांचे स्वागत श्री नंदलालजी चोरडिया,श्री नेमीचंदजी चोरडिया, श्रीमती सजनबाई दुधेडिया यांनी केले. सोना सिढी व वाढदिवसाचे नियोजन श्री अनिल विद्या चोरडिया, श्री गौतम अलका चोरडिया, श्री महावीर सुरेखा चोरडिया यांनी केले.
कार्यक्रमासाठी श्री कांतीलालजी धाडीवाल, संपतलालजी धाडीवाल, रूपेशजी धाडीवाल, अनिलजी टाटीया, अशोकजी फुलफगर, हर्षलजी देवडा, प्रफुल्लजी कोचर, शशिकांतजी सुराना, नंदलालजी पगारीया, तेजमलजी मुथ्था, विजयजी पारख, सतिशजी कोटेचा, नितीनजी जैन, मयुरजी कांकरिया, ललितजी मोदी, शांतीलालजी कोचर, शांतीलालजी अलीझाड, विजयजी कांकरिया, पुथ्वीराजजी कोचर, दिनेशजी बागरेचा, चंदुशेठ राका, महेशजी बनकर,सतिशजी लोढा, तसेच निफाड, नासिक, पुना, लासलगाव, पि. बसवंत, कुंदेवाडी, दावचवाडी, पालखेड येथील जैन समाजातील प्रतिष्ठीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी राहुलजी चोरडिया, गौरवजी चोरडिया, मधुरजी चोरडिया, गुलशनजी चोरडिया, विशालजी चोरडिया, आदेशजी चोरडिया, सौ भाग्यश्री चोरडिया, सौ ऋतुजा चोरडिया,सागर कांकरिया ,श्रेणिक सुराना,निखिल पगारिया, प्रविण मुथा, सागर पारख,यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन व आभार निफाड श्रावक संघाचे संघपती नंदलालजी चोरडिया, श्री नंदलालजी बाफना यांनी केले. कार्यक्रमाची सांगता महामांगलिक ने करण्यात आली.