भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयाला राष्ट्रीय मुल्यमापन आणि मान्यता परिषदेच्या वतीने ” ब” दर्जा प्रदान
भोसरी, येथील भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाची विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या तीन तज्ज्ञ सदस्य मुल्यमापन आणि मान्यता समिती ने तपासणी केली आणि त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल व गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त करुन सर्व निकषांच्या आधारावर ” ब ” दर्जा दिला आहे.