कासारवाडी येथील पार्श्वनाथ सोसायटी मधील प्यारीबाई पगारिया सभागृहामध्ये पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या अहिंसा सप्ताहामधील शुभारंभाचा कार्यक्रम ” धार्मिक प्रार्थना आणि अनुष्ठान “भक्तामर पठण” अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरुषांनी श्वेत पोशाख आणि महिलांनी लाल रंगाची साडी परिधान केली होती , त्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर ,धार्मिक आणि मंगलमय वातावरणामध्ये पार पडला .यावेळी प्रामुख्याने विविध संघाचे अध्यक्ष ,पदाधिकारी तसेच भाविक उपस्थित होते .या सर्वांनी भक्तामर पठनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.