चिखली – नवचैतन्य सामाजिक संस्था आयोजित 21 /25 वर्षापासुन मदतनीस चे काम करणार्या मावशीनां सेवा, कर्तृत्व पुरस्कार प्रदान, व हळदीकुंकू समारोह जैन स्थानकभवन आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारोह साठी उद्घाटक जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ गिरिजा शिंदे पुणे, प्रमुख अतिथीगण व्याख्यात्या डॉ स्मिता कर्वे पुणे, हास्यक्लब संचालिका सौ मीना पोकर्णा चिंचवड, धार्मिक योगदान असणार्या सौ अंजली कटारिया कासारवाडी, स्वागत अध्यक्षा सुनिता देसरडा चिंचवड, आणि मंगल गुगळे आदी मान्यवर उपस्थित राहिले.
