पिंपरी चिंचवड, जैन महासंघाच्या च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त दिनांक 4 एप्रिल पासून दिनांक 10 एप्रिल पर्यंत अहिंसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे .आणि 10 एप्रिल रोजी भगवान महावीर जयंती च्या दिवशी, अहिंसा रॅली चा शुभारंभ आठवडे बाजार रावेत या ठिकाणाहून दुपारी साडेतीन वाजता होणार आहे आणि रॅलीचा समारोप आर एम डी स्कूल जैन विद्या प्रसारक मंडळ या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणाहून अहिंसा पदयात्रा सायंकाळी पाच वाजता निघून प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह मध्ये सायं 6 वाजता सदर पदयात्रेचा समारोप केला जाणार आहे , मोरे सभागृहामध्ये जैन संगीतरत्न मोहित भाई बारोट पालीताना, यांचा प्रभु भक्ती हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे .याच वेळी अहिंसा पुरस्कार आणि इतर पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे. दिनांक 4 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या अहिंसा सप्ताहातील कार्यक्रम खालील प्रमाणे असणार आहेत.