पुणे, गेल्या आठ दशकापासून घराघरांमध्ये पोहोचलेल्या व घराच्या अविभाज्य भाग झालेल्या जयराज अँड कंपनीचे संस्थापक कै.हिराभाई शहा (चोखावाला) यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त मार्केट यार्ड मधील हमाल कामगार यांच्या मुलांना दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या 18 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
आदित्य गाडे, दर्शन कुंभार,ओम दळवी,भार्गव मारणे,सुरज रसाळ,यश गर्जे,तेजस्वी करपे,निकिता पवार,संस्कृती गोळे,सृष्टी कुडले,सिद्धेश राजिवडे,श्रद्धा खराडे,अंकिता पर्वते,सोहम जगताप ही दहावी उत्तीर्ण झालेली, संस्कृती फुंदे,स्नेहा बिनवडे,रुचिता धायगुडे,समर्थ गर्जे ही बारावी उत्तीर्ण झालेली विद्यार्थी.
या कार्यक्रमासाठी गुजराती बंधू समाजाचे कार्यकारी विश्वस्त नैनेश नंदू,जयराज ग्रुपचे राजेश शहा, दीपक बोरा,प्रवीण चोरबेले,आशिष दुगड, राजेंद्र बाठिया,रायकुमार नहार,रमेशभाई पटेल,दिलीप रुणवाल,हमाल पंचायत तर्फे दत्ताभाऊ डोंबाळे,संदीप मारणे,शिवाजी बाबर,रिक्षापंचायतचे नितीन पवार उपस्थित होते.
शैक्षणिक,आरोग्य विषयक सामाजिक कामाचे नियोजन दरवर्षी जयराज अँड कंपनीकडून होत असते. वैद्यकीय मध्ये मूळ गावी मेहसाणा जिल्ह्या मध्ये कांचन हिरा आयुर्वेदिक कॅन्सर रिसर्च सेंटर गेल्या 7 वर्षांपूर्वी सुरू केले, रोज तीनशेच्या आसपास गरजू रुग्ण लाभ घेत आहेत.
एच व्ही देसाई आय हॉस्पिटलच्या मदतीने गरजूंची डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया चे आयोजन होत असते.
कै.हिराभाई शहा यांनी लावलेल्या सामाजिक रोपटे हे वटवृक्षात रूपांतर होत आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणपती मंडळाचे अध्यक्ष गोरखभाऊ मेंगडे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कुलकर्णी यांनी केले.