चांदवड, शैक्षणिक क्षेत्रात 1928 पासून महत्वपूर्ण योगदान देणारी आणि भारतातील एक सुविख्यात शैक्षणिक संस्था जी आज आधुनिक शिक्षण आणि गुरुकुल संस्कार यांचा मेळ घालणारे भारतातील एक शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते.
या संस्थेस काल दिनांक 03 सप्टेंबर 2025 रोजी श्री.ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स मुंबई-पुणे पंचम झोन तसेच राष्ट्रीय महिला शाखेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते कर्मवीर भाऊराव पाटील हा पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला. संस्थेच्या वतीने विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री.बेबीलालजी संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री.अजितकुमारजी सुराणा तसेच विश्वस्त सदस्य श्री.सुनीलभाऊ चोपडा यांनी स्विकारला.
प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेशजी गोसावी,शिक्षण उपसंचालक डॉ.ज्योतीजी सोळंकी, सर्व जीव मंगल प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष डॉ.कल्याणजी गंगवाल, जैन कॉन्फरन्सचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अविनाशजी चोरडिया, भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पारसजी मोदी, श्री.सुनीलजी चोपडा,डॉ.अशोकजी पगारिया,श्री.मनोहरलालजी लोढा,मा.रुचिराजी सुराणा,मा.विमलजी बाफना,मा.रिचाजी जैन,मा.सागरजी साखला प्रमुख अतिथी म्हणून तसेच विशेष अतिथी म्हणून श्री.प्रकाशजी गादिया,श्री.दिलीपजी सोनीगरा,श्री.सुभाषजी ललवाणी मा.शोभाजी बंब आदि उपस्थित होते.
आकुर्डी,निगडी पुणे येथील ग.दि.माडगूळकर ऑडिटोरीअम हॉलमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा अतिशय उत्साहात संपन्न झाला.