श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स तर्फे महाराष्ट्रातील गणमान्य शैक्षणिक संस्था एवम प्राचार्य पुरस्कार

आकुर्डी (पिंपरी-चिंचवड) – शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स (मुंबई-पुणे पंचम झोन व राष्ट्रीय महिला शाखा) यांच्या वतीने महाराष्ट्रातील गणमान्य शैक्षणिक संस्था व कार्यक्षम प्राचार्यांचा भव्य सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा ग.दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेशजी गोसावी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. कल्याणजी गंगवाल होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. या प्रसंगी संस्थेचे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष अविनाशजी चोरडिया, मा.पारसजी मोदी संस्थेचे जैन भवन योजना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोकजी पगारिया, जीव दया योजना राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरलालजी लोढा , राष्ट्रीय संघटन मंत्री नितीनजी चोपडा, संस्थेच्या पूर्व राष्ट्रीय महिला अध्यक्षा रुचीराजी सुराणा, पुष्पाजी गोखरु, संस्थेच्या महिला महामंत्री मा. रिचाजी जैन, संस्थेचे पूर्व राष्ट्रीय युवा अध्यक्ष मा. सागरजी साखला, राष्ट्रीय महिला वरिष्ठ मार्गदर्शक लताजी पगारिया व लताजी चोरडिया तर विशेष अतिथी म्हणून तेरा पंथ समाज पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष मा. प्रकाशजी गादिया,दिलीप सोनीगरा ज्वेलर्सचे अध्यक्ष मा. दिलीपजी सोनिगरा, स्वानंद पिंपरी चिंचवड अध्यक्षा मा.शोभाजी बंब हे मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना डॉ. कल्याणजी गंगवाल यांनी शाकाहार चे महत्व विशद केले तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. सुरेशजी गोसावी यांनी विद्यापीठ, संस्था व प्राचार्य यांच्यातील समन्वयाने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास यावर भाष्य केले तर सर्वांच्या सहकार्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठला नामांकनामध्ये महाराष्ट्रातील  प्रथम क्रमांक  प्राप्त झाला याबद्दल संस्था व प्राचार्य यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमांमध्ये मान्यवरांचे स्वागत पंचम झोनचे अध्यक्ष नितीनजी बेदमुथा यांनी केले. प्रास्ताविक संस्थेच्या राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा प्रा. सुरेखा कटारिया यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. प्रकाश कटारिया यांनी केले. याप्रसंगी खालील गणमान्य शैक्षणिक संस्थांना व प्राचार्यांना पुरस्कृत करण्यात आले.

शैक्षणिक संस्था व पुरस्कार

पुरस्कारप्राप्त शैक्षणिक संस्था:

  1. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवडराष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी  पुरस्कार
  2. श्री नेमिनाथ जैन ब्रह्माचार्याश्रम, चांदवडकर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार
  3. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ, कडाकर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार
  4. महावीर प्रतिष्ठान, पुणेडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार
  5. आनंदतीर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार
  6. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन, पुणेराष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी पुरस्कार
  7. श्री जैन ओसवाल बोर्डिंग, नाशिकडॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार
  8. अशोका एज्युकेशन फाउंडेशन, नाशिकराष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी पुरस्कार

कार्यक्षम प्राचार्य पुरस्कार प्राप्त:

कार्यक्षम प्राचार्य

डॉ. किशोर देसर्डा, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे

डॉ. सदाशिव कांबळे, प्रितम प्रकाश कॉलेज आर्टस्, कॉमर्स, भोसरी

डॉ. संजय चाकने, टिकाराम जगन्नाथ कॉलेज आर्टस्, कॉमर्स, सायन्स, खडकी

डॉ. संगीता शिंदे, सरहद्द कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स, पुणे

प्रा. संतोष भंडारी, भारतीय जैन संघटना ज्यु. कॉलेज, वाघोली

प्रा. सुनिता नवले, श्री फत्तेचंद जैन ज्यु. कॉलेज, चिंचवड

मा. निर्मलजी छाजेड, स्वाध्यय संघ प्रचार प्रसारक प्रमुख, बडनेरा (अमरावती)

डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा कॉलेज आर्टस्, कॉमर्स, सायन्स, चिंचवड

प्रा. सुरेखा बिरादार, संचेती ज्यु. कॉलेज, थेरगाव

प्रा. डॉ. कांचन शिंदे, अरिहंत कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स, पुणे

प्रा. वर्षा पिल्ले, पुष्पादेवी दुगड ज्यु. कॉलेज, पुणे

प्रा. विक्रम काळे, श्रीमती गेंदीबाई तारातंद चोपडा ज्यु. कॉलेज, चिंचवड

डॉ. अनुराग कश्चप, कमिन्स वुमन्स आर्कीटेक्चर कॉलेज, पुणे

डॉ. मेहबुबसाहब नगरवाडी, अर्हम कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स, पुणे

प्रा. श्रीकांत चौगुले, पी.सी.एम.सी. ज्यु. कॉलेज, पिंपरी

डॉ. प्रकाश पाटील, कॅम्प एज्युकेशन सोसायटी, आर्टस्, कॉमर्स, सायन्स कॉलेज, निगडी

प्रा. मितल शहा, आर. के. एल. गॅलेक्सी इंटरनॅशनल, आळंदी

डॉ. अजय फुलम्बरकर, के. जी. एज्युकेशनल कॉलेज, पुणे

प्रा. सुर्यकांत मुंगसे, ज्ञानेश्वर ज्यु. कॉलेज आर्टस्, कॉमर्स, सायन्स, आळंदी

प्रा. मृदुला गायकवाड, नॉव्हेल इंटरनॅशनल कॉलेज, निगडी

प्रा. महेश देसाई, वर्धमान एज्युकेशन रिसर्च सेंटर, पुणे

डॉ. संतोष भोसले, राजश्री शाहू इंजिनिअरिंग कॉलेज, वाकड

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड कटारिया यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन मा. नितीनजी बेदमुथा प्रा. सुरेखाजी कटारिया , प्रांतीय महिला अध्यक्ष कल्पनाजी कर्णावट, प्रांतीय युवा अध्यक्ष देवेंद्रजी पारख, प्रा. प्रकाशजी कटारिया डॉ. श्वेता राठोड कटारिया , मा. शलाकाजी कटारिया, एडवोकेट शलाकाजी कोठारी  यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय व पंचमझोन चे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Leave a Comment