मुंबई येथील विलेपार्ले (पुर्व) श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे ३० वर्षाहून जुने मंदिर आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतानाही, घाईघाईने मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर जमीनदोस्त केल्याने जैन समाजाच्या भावना दुखावल्याच्या निषेधार्थ पुण्यातील एच.एन.डी जैन बोर्डिंग येथे सकल जैन समाजाने मिटिंग घेऊन निषेधाचा ठराव करण्यात आला व शासनाने लक्ष वेधण्यासाठी निषेध मोर्चा काढून मा. कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात यावे असे ठरले.
ही एक छोटीशी घटना असे कोणास वाटत असले तरी हा जैन धार्मियांसाठी धोक्याचा मोठा इशारा आहे. सत्ता बल यांच्या ताकदीवर जैन समाजाचे श्रध्दास्थान ताब्यात घेतले जातील. जैन समाज शांतताप्रिय आहे. त्यामुळे तो आपलं काही वाकडं करू शकत नाही. हा समज केल्याने सातत्याने जैन समाजाला टार्गेट केले जात आहे. ज्या पध्दतीने हे मंदिर पाडण्यात आले ते अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्यामुळे जैन समुदायात संताप निर्माण झाला आहे.
या कारवाईमुळे देशभरातील जैन समाज आणि इतर शांतता प्रिय समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. याबाबत सकल जैन समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथील विलेपार्ले (पुर्व) येथील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि मंदिराच्या पुनबांधणीची कारवाई करावी यासाठी चिंचवड येथे निवेदन देण्यात आले. कृपया ही बाब गांभीर्याने घेत आवश्यक ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.
यावेळी अभय छाजेड, अचल जैन, मिलिंद फडे, सुरेंद्र गांधी, चंद्रकांत पाटील, अजीत पाटील, अण्णासाहेब पाटील, अशोक पगारीया, राजेंद्र सुराणा, अड योगेश पांडे, अड शितल लोहाडे, उदय लेंगडे, प्रितम मेहता, सी.ए. सुर्यकांत शहा, मनीष बडजाते, अभय जैन, किरण शहा, पद्म अजमेरा, सुजाता शहा, महावीर शहा, सुनिल कटारिया अनेक जैन समाजाचे प्रतिनीधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.