पूना मर्चेंट्स चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमाचा १ नोव्हेंबरपासून शुभारंभ

पुणे : समस्त पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत असलेल्या दि पूना मर्चटस् चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमाचा शुभारंभ उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या हस्ते रविवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता होणार आहे.यावेळी मा. लोकसभा सदस्य श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे, म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गंगाधामजवळील जयजिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजुश्री सभागृहात होणार आहे. चेंबरच्या या सामाजिक उपक्रमाचे यंदा ३९ वे वर्ष आहे.

Leave a Comment