बारामतीत ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात साजरा !
७०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, सामूहिक पठणाने निर्माण झाली सकारात्मक ऊर्जा ! बारामती, ९ एप्रिल २०२५ रोजी भारतासह जगभरातील १०८ देशांमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग म्हणून बारामती शहरातही ‘जितो’ व ‘जैन सोशल ग्रुप बारामती’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.