भगवान महावीर निर्वाण कल्याणकानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
पुणे : तीर्थंकर भगवान महावीर यांच्या निर्वाण कल्याणकानिमित्त कात्रज येथील आगम मंदिरातील पावापुरी जलमंदिरात यंदा २१ वा भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, सुंदर सजावट तसेच विशेष ऑडिओ-व्हिज्युअल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
