औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, पिंपळे निलख जैन सकल संघ ( ABBPP) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचा विक्रम !

रामनवमी, आरोग्य दिन आणि महावीर जयंतीच्या त्रिवेणी संगमाचे औचित्य !

पुणे, ​रामनवमी, जागतिक आरोग्य दिन आणि भ.महावीर जन्मकल्याणक या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण, पिंपळे निलख जैन सकल संघ ( ABBPP ) यांच्यातर्फे 6 एप्रिल 2025, रविवार रोजी बाणेर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ​यामध्ये सर्व धर्माच्या नागरिकांनी उस्त्फुर्तपणे प्रतिसाद देऊन या भव्य रक्तदान शिबिराची शोभा वाढवली. या कार्यक्रमा अंतर्गत 811 रक्तदात्यांनी रक्तदान करुन एक उच्चांक प्रस्थापित केला त्यामुळे रक्त पिशव्यांच्या संकलनाचे उद्दीष्ट पुर्ण झाल्याचा विश्वास मुख्य संयोजक श्री सचिन नहार यांनी व्यक्त केला.

Leave a Comment