जवानांकडून प्रत्येकाने शिस्त, प्रामाणिकपणा व देशप्रेम आत्मसात करावे

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांची ‘एनडीए’ला भेट

पुणे: राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त एज्यु-सोशियो हेल्थ कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी , सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च  आणि सूर्यदत्त नॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीला (एनडीए) भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी व त्याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या भेटीचे आयोजन केले होते.

Leave a Comment