अध्यात्मिक आणि प्रेरणात्मक वक्त्या जया किशोरी यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४
अध्यात्मिक आणि भौतिक जीवनाचा समतोल जीवन सुसह्य करेल : जया किशोरी
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स च्या वतीने प्रसिद्ध अध्यात्मिक आणि प्रेरणात्मक वक्त्या जया किशोरी यांना “सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२४ ” ने गौरविण्यात आले . अध्यात्म आणि प्रेरणा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी आणि उत्तम वक्त्या म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला .
पुणे इथे आयोजित सोहळ्यात प्रा डॉ संजय बी चोरडिया संस्थापक व अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन , स्नेहल नवलखा सहयोगी उपाध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन यांच्या हस्ते जया किशोरी यांना सन्मानित करण्यात आले . ट्रॉफी , सूर्यदत्त इन्स्टिटयूट ऑफ फॅशन टेकनोलॉजी च्या विद्यार्थीर्नींनी बनविलेला विशेष स्कार्फ , गोल्ड मेडल आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याप्रसंगी त्यांना संस्थेची संपूर्ण माहिती देण्यात आली .
पुरस्कार स्वीकारल्यानंतर जया किशोरी म्हणाल्या , सूर्यदत्तचा २५ वर्षाचा प्रवास प्रेरणादायी आहे . विविध ज्ञानशाखा सोबत विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले जाते हे महत्वाचे आहे . या अगोदर ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या यादीमध्ये माझे नाव आहे हे अभिमानास्पद आहे . आज युवकांना आध्यत्मिकतेची सर्वात जास्त गरज आहे . भौतिकवादी जगण्याला अध्यात्मिकतेची जोड दिले तर जीवन सुसह्य होईल . शिकत राहणे हा परिवर्तनाचा नियम आहे .
प्रा डॉ संजय बी चोरडिया म्हणाले ,
जया किशोरी या एक भारतीय आध्यात्मिक वक्त्या, गायिका, प्रेरक वक्त्या, जीवन प्रशिक्षक आणि सामाजिक सुधारक आहेत ज्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवचनांसाठी आणि भावपूर्ण भजनांसाठी ओळखल्या जातात. त्यांना ‘किशोरी जी’ आणि ‘आधुनिक युगातील मीरा’ म्हणून ओळखले जाते.
सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार आणि लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड्स च्या निमित्ताने प्रख्यात व्यक्तिमत्त्वांच्या अमूल्य योगदानाची दखल घेतली जाते . उत्कृष्टता हे सूर्यदत्त समूहाचे वैशिष्ट्य आहे. संस्थेच्या अडीच दशकांच्या प्रवासात आणि 2003 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांनी सातत्यासह वैशिष्ठयपूर्ण उंची गाठली आहे . शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , अध्यात्मिक , औदयोगिक , वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात ज्यांच्या अमूल्य योगदानामुळे परिवर्तन घडून आले आहे अशा व्यक्तिमत्वाना हा पुरस्कार प्रदान केला जातो . विद्यार्थी , पालक आणि समाजाच्या दृष्टीने हा सन्मान प्रेरणादायी ठरतो .
आजवर पद्मभूषण पंडित भीमसेन जोशी, पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंजन, योगाचार्य पद्मभूषण डॉ. बी.के.एस. अय्यंगार, प्रख्यात अभिनेते पद्मभूषण अनुपम खेर, पद्मभूषण शिव नाडर, किरण बेदी, पद्मविभूषण मोहन धारिया ,पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर , पद्मभूषण डॉ.विजय भटकर, अध्यात्मिक आणि प्रेरक वक्ता गौर गोपाल दास आदीना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.