सौ. लता पगारिया यांना राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार प्रदान !

कासारवाडी येथील सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री ऑल इंडिया श्वे स्था जैन कॉन्फरन्सच्या महिला शाखेच्या पुर्व राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि विद्यमान राष्ट्रीय मार्गदर्शक आहेत. त्यांना नुकताच , आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना,जागतीक शांती परिषद , आणि भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ या संस्थांच्या वतीने पुणे येथील पत्रकार भवन या ठिकाणी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एम पठाण, पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे पूर्व अधिष्ठाता प्राचार्य डॉ सुधाकर जाधववर तसेच मानवाधिकार राजदूत संघटना अध्यक्ष अविनाश सकुंडे आणि स्वयं सेवी संस्था महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय कांबळे आणि प्रा गोरख साठे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते आदर्श माता हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

Leave a Comment