आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या विश्व् गुजराती समाज च्या अहमदाबाद येथील मुख्यालयात दिनांक ३०/१२/२०२४ रोजी संस्थेचे निवडणूक अधिकारी डॉ. प्रफुल्लभाई ठाकूर व ऍड. ए. एस. सय्यद यांच्या उपस्थितीमध्ये विश्व् गुजराती समाज च्या महासमितीची निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीचे निकाल मा. निवडणूक अधिकारी यांनी नुकतेच जाहीर केले आहेत. त्याद्वारे पुणे येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक, सामाजिक क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व, जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा यांची महासमितीच्या सभासद पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड म्हणजे पुण्यातील विशेषतः गुजराती समाजासाठी अभिमानाची बाब आहे. तसेच या निवडीने राजेश शहा यांच्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला आहे.

Leave a Comment