पुणे, “जागतिक आरोग्य दिन” ७ एप्रिल २०२५ निमित्त वीतराग सेवा संघ (साधना सदन) आणि सम्यक योग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक लोक (रेल्वे लायसन्सी पोर्टर) यांच्यासाठी आरोग्य शिबीर आयोजित करन्यात आले. पोर्टर म्हणून या श्रमिक लोकांना जड सामान उचलणे, गर्दीच्या वेळेस बराच वेळ उभे रहाणे.. यामुळे त्यांना थकवा, दुखापती आणि आजार होऊ शकतात. तसेच त्यांचे कामाचे वेळापत्रक पण अप्रत्याशित असू शकते ज्यामुळे निरोगी काम- जीवन संतुलन राखणे आव्हानात्मक बनते.