अभिजित धोंडफळे यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’ संचालित पुणे इन्स्टिट्यूट ऑफ
अप्लाईड टेक्नॉलॉजीतर्फे ‘ऑरा २०२५’ प्रदर्शन
पुणे: “आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट अतिशय सुरेख पद्धतीने उलगडला आहे. भवतालच्या टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक कलाकृती उभारून त्याचे प्रदर्शन चिथारण्याचा विद्यार्थ्यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन नामवंत शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी भवताल समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर काम करावे, असेही त्यांनी सांगितले.