भारतात प्रथम राष्ट्रसंत प.पू.आनंदऋषीजी म.सा.यांच्या ऊर्जा चरणांची स्थापना !

 

पुणे ; आनंद दरबार दत्तनगर कात्रज येथे भारतात प्रथमच १४ शुभचिन्ह असलेले राष्ट्रसंत आचार्य भगवंता प.पू.आनंदऋषीजी म.सा यांच्या ऊर्जा चरणांची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली

आचार्य भगवंत प.पू. श्री.विरागसागर सुरीश्वरजी म.सा , वात्सल्य मूर्ति प.पू. श्री इन्दुप्रभाजी म.सा.आदि ठाणा यांच्या पावन सान्निध्य ऊर्जा चरणांचा भव्य ‘वरघोडा’ श्री. किसनराव कामठे यांच्या निवासस्थानावरून आनंद दरबार पर्यंत काढण्यात आला. ढोल ताशांचा गजर, महिलांच्या फुगड्या, बालवारकरी यांची दिंडी आणि टाळ मृदुंगाच्या गजराने वातावरण मंगलमय झाले. 

आज पासून आनंद दरबारला,आनंद तीर्थ म्हणा कारण गुरुचे चरण या ठिकाणी स्थापित झाले असून ही वास्तू पवित्र झाली आहे असे मत परम पूज्य विरागसागर सुरीश्वरजी म.सा यांनी उपस्थित धर्मसभेत व्यक्त केले.

पूज्य.इंदूप्रभाजी म.सा.म्हणाल्या महाराष्ट्राला गुरु भक्तीची मोठी परंपरा आहे. वैष्णव धर्माच्या पताका,पादुका ज्याप्रमाणे पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला घेऊन जातात. त्याचप्रमाणे आनंद बाबांच्या भक्तांनी आनंद दरबार मध्ये ऊर्जा चरण स्थापित केले आहेत. ऊर्जा चरणांमुळे आनंद दरबार जैन धर्माचे प्रति पंढरपूर झाले आहे .

आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका म्हणाले काळाप्रमाणे आपण देखील बदलायला हवे पुढच्या पिढीला 

पूज्य आनंदऋषीजींच्या भक्ती-शक्तीच्या अथांग सागराचे दर्शन व्हावे यासाठी चरण कमल पादुकांची स्थापना केले आहे. 

यावेळी सुनीलजी पारख, दत्तात्रेय कामठे, रमनलाल लुंकड, डॉ. सुमतिलाल लोढा, कमलाबाई कर्णावट , सुरेशजी डाकलीया, रविन्द्र नहार, रविन्द्र लुंकड, गणेशजी चोरडिया, अक्षय जैन , मा.नगरसेवक युवराज बेलदरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या प्रसंगी महाप्रसादी चा लाभ श्रीमती सक्करबाई आलमचंदजी चोरडिया व जैन श्रावक संघ ,वडगाव मावळ यांना मिळाला.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रकाश बोरा , पारस धोका , संतोष भंडारी , सुयोग भंडारी , संतोष दुगड व आनंद दरबार चे सर्व सदस्य , युवा मंडळ, महिला मंडळ आणि बहू मंडळ यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लुंकड यांनी केले .आभार समितीचे अध्यक्ष – उमेद धोका यांनी केले.

Leave a Comment