पुणे व नागौर येथील मंदिरांच्या उभारणीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थापक अध्यक्ष राजेश पी. नाहार यांचा विशेष सन्मान !
पुणे, स्त्री ही केवळ त्यागमूर्ती नसून शक्ती, संघर्ष आणि कर्तृत्वाचे प्रतीक आहे. स्त्रीला केवळ आदर्शाच्या चौकटीत अडकवू नका. तिने आधीच मोठ्या प्रमाणात त्याग केला आहे. देवीने महिषासुर, चंड-मुंड यांसारख्या राक्षसांचा संहार केला, त्याचप्रमाणे आजची स्त्रीदेखील समाजातील अन्याय, विषमता आणि नकारात्मक शक्तींविरुद्ध समर्थपणे लढा देत आहे, असे प्रतिपादन मा. नामदार श्रीमती माधुरीताई मिसाळ, राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांनी केले.
