मुंबईत झालेल्या शानदार समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाला गौरव
पुणे – सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बन्सी रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डाॅ. संजय बी. चोरडिया यांना नुकताच महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते प्रतिष्ठित अशा सीएसआर हिरोज अवार्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले. दि. ४ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या परळमधील आयटीसी ग्रँड सेंट्रलमध्ये पार पडलेल्या एका शानदार समारंभात हा पुरस्कार प्रा. डॉ. चोरडिया यांना प्रदान करण्यात आला.