सर्व क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान विकसित भारताचे स्वप्न साकार करेल

जागतिक महिला दिनानिमित्त ‘सूर्यदत्त’ तर्फे ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२५’

पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला, चित्रपटसृष्टीतील कलावंतांना सन्मानित करण्यात आले. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या हस्ते महिलांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले. सर्व क्षेत्रातील महिलांचे वाढते योगदान विकसित भारताचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केला.

Leave a Comment