दिनांक १५ जुलै २०२५ रोजी स्व. श्री. राकेश देवीचंद जैन यांच्या एकोणिसाव्या स्मृतिदिना निमित्त पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व जिन कुशल सेवा मंडळ यांच्या तर्फे ४६व्या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीराचे उद्घाटन पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष श्री. देवीचंद जैन आणि विश्वस्त मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मॅनेजिंग ट्रस्टी श्री. राजकुमार चोरडिया यांनी आपल्या भाषणात असे सांगितले की, रक्तदानापूर्वी केल्या जाणाऱ्या प्राथमिक तपासणींमुळे रक्तदात्यास आरोग्याचे महत्व कळून येते आणि त्यानुसार रक्तदाता स्वतःची काळजी घेतो. रक्ताचा तुटवडा असताना राकेश जैन मेमोरिअल रक्तकेंद्राने फक्त पूना हॉस्पिटलच नव्हे तर आजूबाजूच्या छोट्या मोठ्या सर्व हॉस्पिटलला रक्त व रक्तघटकांची उपलब्धता करून दिली आहे.
राकेश जैन यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या रक्तकेंद्रामुळे आज अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना आपत्कालीन सेवा, तसेच राकेश जैन मेमोरियल रक्तकेंद्राने तात्काळ स्वरूपात प्लेटलेट्स, रक्त व रक्ताचे इतर घटकांची पूर्तता करून रुग्णांना वेळीच उपचार मिळवून दिले. या शिबीरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रूग्णालयाचे अध्यक्ष श्री. देवीचंद जैन, मॅनेजिंग ट्रस्टी श्री. राजकुमार चोरडिया, जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी श्री. पुरूषोत्तम लोहिया, विश्वस्त श्री. राजेशभाई शाह, श्री. नैनेश नंदू, श्री भबुतमल जैन, श्री अशोक ओसवाल, पूना हॉस्पिटलचे सी ई ओ डॉ. रवींद्रनाथ, मेडिकल डायरेक्टर ले. कर्नल (निवृत्त) डॉ. गिरीश देशमुख व जिन कुशल सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. सुरेश जैन व कार्यकारी परिवार इत्यादी उपस्थित होते.