येरवडा कारागृहात अभंग वारी कार्यक्रम ; ५०० बंद्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

पुणे, कारागृहातील बंद्यांच्या मानसिक स्वास्थ्याला चालना देत त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने येरवडा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी (१७ जुलै) ‘अभंग वाणी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे ५०० बंद्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कारागृह विभागाच्या ‘सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्यानुसार विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून ‘आर के स्मृती बहुउद्देशीय संस्था,पुणे’, ऋषीआनंद वन – हडपसर, व सुकांता थाळी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Leave a Comment