पुणे : बिबवेवाडी जैन स्थानक येथे सन २०२६ च्या पावन चातुर्मासानिमित्त महासाध्वी राजस्थान वीरांगना प. पू. श्री जयश्रीजी म.सा., श्री राजश्रीजी म.सा. तथा श्री समीक्षाश्रीजी म.सा. यांचा श्री बाळासाहेब राजकुमार कर्णावट (कोयलीकर) यांच्या निवासस्थानापासून भव्य शोभायात्रेद्वारे मंगलमय प्रवेश मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
