वैजापूर, संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा संदेश देणारे जैन धर्मियांचे 24 वे तिर्थंकर भगवान महावीर स्वामींच्या 2624 व्या जन्मकल्याणक दिवसाचे औचित्य साधून संपूर्ण विश्वाच्या शांती आणि कल्याणासाठी जितो इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन च्या वतीने फक्त भारतातच नव्हे तर इतरही 108 देशांमध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी म्हणजे दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 9.30 वाजेपर्यंत नवकार महामंत्राच्या जाप चे आयोजन करण्यात आले. श्रीमान बन्सीलालजी रुपचंदजी संचेती जैन स्थानक, वैजापूर येथे मा.नगराध्यक्ष व वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन रवींद्र संचेती (बाळासाहेब)यांच्या र्गदर्शनाखाली व सकल जैन समाजातर्फे आयोजित या कार्यक्रमासाठी फक्त जैन समाजातीलच नव्हे तर इतरही धर्माच्या राजकीय, व्यापारी, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.