श्री पूना गुजराती बंधू समाज ही सामाजिक क्षेत्रात नियमितपणे कार्यरत असलेली संस्था आहे. संस्थेच्या वतीने विविध उपक्रम, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सतत राबवले जातात. गुजराती समाजातील गेल्या ११० वर्षांपासून व क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देत असलेली संस्था आहे. या संस्थेच्या युथ विंगने यावर्षी प्रथमच भव्य अशा क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उदघाटन आज रोजी संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जॉईंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू व उपाध्यक्ष वल्लभभाई पटेल उपस्थित होते. पुढील दोन दिवस या स्पर्धेचे रंगतदार सामने नाजूश्री येथील क्रिकेट ग्राऊंडवर खेळवले जातील.
