पोलीस खरे मित्रमैत्री दिनाचा आगळा वेगळा उपक्रम

नाशिक , 4 ऑगस्ट जागतिक मैत्रीदिन निमित्त श्री राधिका फाउंडेशन व महावीर इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने पोलिसांसोबत मैत्री दिवस साजरा करण्यात आला.खरा मित्र तोच असतो , जो संकटासमयीं धावून येतो; आम्हास कोणतेही संकट येवो,आम्हास प्रथम आठवण येते पोलिसाचीच येते ,व् ते लगेच धावून येतात,सण उत्सव ,स्वतःच्या घरातील कार्यक्रम सोडून ते हजर असतात .म्हणजेच खऱ्या अर्थाने तेच खरे मित्र म्हणून या दिवशी आम्ही पोलिसानाच् फ्रेंडशिप बेल्ट बांधून त्यांच्या सोबत मैत्रीदिन साजरा केला. व भेट म्हणून पेन वाटप केले .तसेच कड सरांना सामाजिक सेवा पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
ह्या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य
पंचवटी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक-श्री मधुकर कड ज्यांना दोन वेळेस राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले आहे. त्यांनी आम्हा सर्वांशी चर्चा करून खुप महत्वाच्या गोष्टी वर मार्गदर्शन केले. पंचवटी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक- ज्योती मॅडम आमणे
पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव, वर्षा पाटील व पंचवटी पोलिस स्टेशन पोलिस स्टाफ यांनी केले व या उपक्रमाचे कौतुक ही केले. कार्यक्रम यशस्वतेसाठी
श्री राधिका फाउंडेशन च्या संस्थापिका चेतना ताई सेवक, राणी कासार, विकी कुटे, महेंद्र आहिरे, दिपाली केंगे, श्री व सौ ज्योती जोशी,रेखा काळे, स्नेहा शिंपी, उमा परदेशी,महावीर इंटरनॅशनल चे
अध्यक्ष श्री अनिल नहार, श्री राजेंद्र बाफना,
सौ संगीता बाफना, श्री किशोर बाफना,
श्री जयंत एंडाईत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment