सर्वांगीण आणि मूल्याधारित शिक्षण देणाऱ्या सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स चा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकाळ महाब्रँड्स ने सन्मान

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे  राज्याला उद्योग , शिक्षण , बांधकाम  आणि इतर क्षेत्रात स्वतःचा ब्रँड आघाडीवर नेणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांचा सन्मान सोहळा नुकताच पुणे  येथे संपन्न  झाला. यावेळी त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या  जडणघडणीत  महत्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सन्मान सोहळ्यात  वैश्विक दृष्टिकोनातन ज्ञानदान ,  शिक्षणतज्ज्ञांची कोअर टीम आणि सल्लागार मंडळ,   विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी भारतात आणि भारताबाहेर अभ्यास दौरे करण्यावर संस्थेचा भर ,   मूल्याधारित शिक्षण  ,  संस्थेस सतत तज्ज्ञ मंडळींच्या भेटी आणि व्याख्याने l  ‘नॅक’ मान्यताप्राप्त  संस्था ,  पुस्तकी ज्ञानाऐवजी आणि उद्योगांची गरज ओळखून रोजगारक्षम शिक्षणाची कास ,   राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेचे मूल्य रुजविण्यासाठी सातत्याने प्रयत्न तसेच  विविध रँकिंगमध्ये सतत आघाडीवर या सूर्यदत्त च्या वेगळेपणामुळे   सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्स ला” ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र ” म्हणून गौरविण्यात आले .

महाराष्ट्र राज्य सरकारकडून विविध क्षेत्रातील विस्तारासाठी काय पावले उचलली जात आहेत याबाबत  उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार  यांनी आश्वासक माहिती दिली. गौरवाच्या वेळी प्रत्येक विजेत्यांची अजित पवार यांनी आस्थेने विचारपूस  केली  तसेच शाबासकीची थाप दिली . यामुळे ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र सन्मान प्राप्त व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते.

या सन्मानाबद्दल बोलताना  संस्थापक व अध्यक्ष प्रा.  डॉ.  संजय बी. चोरडिया म्हणाले ,  ‘सूर्यदत्त’च्या माध्यमातून शिक्षणाला नवीन तंत्रज्ञान आणि मूल्यांची जोड दिली.  तसेच आजच्या स्पर्धेच्या युगात नवीन बदलांना आपलेसे करीत सर्वासाठी शिक्षण आणि सर्वांगीण शिक्षण देण्याचे , नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत विविध उपक्रम राबविणे,  पुरस्कार प्रदान करणे,  मान्यवरांना भेटणे,  समाजोपयोगी कार्य करणे, मुख्य प्रवाहातील शिक्षणाबरोबरच जीवन-कौशल्य आधारित सर्वांगीण शिक्षण देणे ध्येय निश्चित केले .  गेली सत्तावीस  वर्षे या ध्येयाच्या दिशेने  अथक वाटचाल सुरू आहे.  नवोन्मेष,  स्टार्टअप संस्कृती आणि उद्यमशीलतेचा विकास, राष्ट्रप्रेम ही  संस्थेची मूल्ये आहेत. केजी ते रिसर्च पर्यंतच्या शिक्षण सुविधा इथे उपलब्ध आहेत. तसेच येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांकरिता बावधन येथील कॅम्पस मध्ये अद्ययावत अशा नव्या सोयी सुविधाची भर पडणार आहे ,

विश्वासार्ह्य  प्लेसमेंट इतिहास , स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन , भविष्यवेधी शिक्षण , सर्वोत्तम व्यक्तींकडून अध्ययन ,माजी विद्यार्थ्यांच जागतिक नेटवर्क, उत्तम पायाभूत सुविधा हि संस्थेची वैशिष्ट्ये आहेत .

योगवारी यात्रा आरोग्याथॉन ,  ट्वेंटी फोर अवर्स सायलेंट रीडेथॉन,  अन्फोल्ड हिडन पोटेन्शियल थ्रू ब्लाईंड फोल्ड, सलग पंचवीस तास देशभक्तिपर गाणी गाणारी काव्यथॉन  , लायनिग द मॅप ऑफ इंडिया थ्रू १,१०० तुलसी सँपलिग्ज ,  ७००० किलो पुणेरी महामिसळ गरजूंना दान ,  कलाआरोग्यम् योगथॉन ,  तालआरोग्यम् योगथॉन , नवरात्री : भारताचे रंग असे नावाजलेले जागतिक विक्रम संस्थेच्या नावे आहेत.  जागतिक योगदिनानिमित्त आयोजित सिद्ध मंत्रा हास्य क्युरेटीव्ह योगथॉन २०२३ मध्ये सलग सहा  तासाहून अधिक वेळ योग करत ‘सिद्ध मंत्रा हास्य क्युरेटीव्ह योगथॉन २०२३’चा विश्वविक्रम तर दोन तासाहून अधिक वेळ सिद्धासन योग् करत दुसरा विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या ई-कचऱ्यावर तोडगा म्हणून ‘सूर्यदत्त’च्या कॅम्पसमध्ये ई-कचऱ्याचे तुकडे एकत्र करून ई-चित्ता साकारण्यात आला होता .  यासाठी मुख्यतः मोबाईलचा वापर करण्यात आला.   मंगळयान,  फ्लाईंग हॉर्स,  शार्क आणि हॉर्स विथ कॅरिअट अशा प्रतिकृतीही  विद्यार्थ्यांनी ई-कचऱ्यापासून तयार केल्या आहेत. असे सामाजिक उपक्रम संस्था सातत्याने राबवीत आली आहे . राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करणे हे देखील संस्थेचे उत्तम कार्य आहे . संस्थेच्या वतीने सातत्याने आरोग्य शिबिरे , रक्तदान  शिबिरे, दिव्यांगांकरिता  कृत्रिम अवयवाचे मोफत वितरण , दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल  वितरण , शिलाई मशीन मोफत वितरण व शिलाई प्रशिक्षण , शैक्षणिक साहित्य मोफत वितरण आदी  सर्व बाबींचा विचार करून संस्थेला महाब्रान्ड सन्मानाने गौरविण्यात आले आहे .

कार्यक्रमाला सकाळचे संपादक सम्राट फडणीस , सकाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव , एच- २ ई पॉवर सिस्टिम या कंपनी चे संस्थापक , व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मयूर आणि मान्यवर उपस्थित होते .

विद्यार्थी , पालक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी या यशाबद्दल प्रा डॉ संजय बी चोरडिया आणि व्यवस्थापनाचे अभिनंदन केले .

 

Leave a Comment