पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२६ : व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दि. २ ऑक्टोबर रोजी मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात ‘नो यूपीआय डे’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाल्याची माहिती पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बाठिया यांनी दिली.
