पुणे: मार्केट यार्डात गुरुवारी भगवान महावीर जन्म कल्याण दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ओम गुरू आनंद गौशालेच्या वतीने मार्केट यार्डातील कष्टकरी कामगार महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, मार्केट यार्ड पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, , ओम गुरू आनंद गौशालेचे अध्यक्ष अभय संचेती, विजय शिंगवी, मनीष संचेती, नितिन नहार, चंद्रकांत मानकर उपस्थित होते.पाटील म्हणाल्या, “भगवान महावीरांनी अहिंसा आणि शांततेचा संदेश दिला आहे.