पुणे, नेत्रचिकित्सा क्षेत्रात नवा मापदंड
पीबीएमए च्या एच.व्ही देसाई आय हॉस्पिटल च्या नूतनिकृत इमारतीचे नुकतेच उदघाटन करण्यात आले . जागतीक दर्जाची नेत्रचिकित्सा प्रदान करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे . या अद्ययावत सुविधेचे उदघाटन बजाज फिनसर्व्ह च्या सुकाणू समितीच्या अध्यक्ष शेफाली बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पीबीएमए च्या एच.व्ही देसाई आय हॉस्पिटलचे चेअरमन नितीन देसाई, अध्यक्ष डॉ.राजेश शहा, उपाध्यक्ष सुधीर साबळे व मनीष जैन, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, एच.व्ही देसाई आय हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ.राहुल देशपांडे, वैद्यकीय संचालक डॉ.सुचेता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते .