पुणे, घोर तपस्वी खद्दरधारी प.पू. गणेशलालजी महाराजसाब यांची 63 वी पुण्यतिथी* त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दरवर्षी देशभरातून लाखों भाविक जालना येथे त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात.प.पू.गणेशलालजी महाराजसाहब यांनी देशभर अहिंसा प्रसाराचे मोठे कार्य केले, ते जैन समाजाचे महान तपस्वी होऊन गेले, सोबत खादी प्रचार प्रसार, अंगीकार, गोशाळा उभारणी आणि इतर अनेक मोठी कार्यें केली. त्यांच्या प्रेरणेने देशभरातील मंदिरात धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अनेक पशु हत्या बंद झाल्या.