राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थ्यांना ग्रामसेवा आणि समाज सेवेची प्रेरणा देणारा उपक्रम – प्रा डॉ अशोककुमार पगारिया

मा. डॉ. अशोककुमार पगारिया,
माझ्या भारतासाठी युवक आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक या ब्रीद वाक्याला अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर कोहिनकरवाडी तालुका खेड येथे संपन्न होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक व्यवहार हा प्रत्येक व्यक्तीला डिजिटल माध्यमातून करता आला पाहिजे, मग ते वाचन असो, एखादे तिकीट बुक करणे असो अथवा एखादा आर्थिक व्यवहार करणे असो. फक्त युवकांनी स्वतः पुरते डिजिटल ज्ञान अवगत करून थांबू नये तर समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या परीने डिजिटल- संगणक साक्षरता शिकवावी म्हणून ‘राष्ट्रीय सेवा योजना : राष्ट्रसेवेची आणि ग्रामसेवेची प्रेरणा देणारी शिबीरे आहेत’ असे मत भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

Leave a Comment