पुणे, सुमारे ११० वर्षांपूर्वी आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी जैन समुदायामध्ये शिक्षणाचा विचार मांडला. धर्मकार्यापेक्षा हा विचार वेगळा असल्याने तत्कालीन जैन समाज व्यवस्थेने त्यांना विरोध केले. परंतु, तरीदेखील आपल्या विचारांवर ठाम रहात आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी संपूर्ण भारतातील जैन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले, असे मत पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांनी व्यक्त केले. श्री महावीर जैन विद्यालयातर्फे उभारण्यात आलेल्या ४०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या भव्य आणि अत्याधुनिक जेएम फायनान्शियल फौंडेशन विद्यार्थीगृह भवनाचे लोकर्पण आज पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
