दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप !

पुणे, द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन,सेवा सहयोग फाउंडेशन,ईनरव्हील क्लब,पुणे इंपिरीयल यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीबाधित व्य5क्तींच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजेशभाई शहा,कार्यकारी संचालक श्री परवेझ बिलीमोरिया,काश्मिरा ठाकर तसेच दृष्टीबाधित पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मंगळवार,दिनांक 24 जून 2025 रोजी झालेल्या कार्यक्रमात दृष्टीबाधित व्यक्ती आणि विद्यार्थी यांनी या बहुमोल मदतीबद्दल मनोगत व्यक्त केले.

गेली अनेक वर्षे सातत्याने हा उपक्रम राबविला जात आहे.इयता पहिली ते कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात येते.पुणे आणि परिसरातील अनेक दृष्टीबाधित व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.

द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन ही सामाजिक संस्था गेली 1952 पासून दृष्टीबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करीत आहे.दृष्टीबाधित व्यक्तींच्या सर्वागीण विकासासाठी दृष्टीबाधित निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम,18 ते 35 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर, डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्यावत हॉस्पिटल इत्यादी विविध प्रकल्प संस्थेमार्फत राबविले जात आहेत.महाराष्ट्र तसेच भारतामधील अनेक दृष्टिहीन व्यक्ती संस्थेच्या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत.

Leave a Comment