छत्रपती संभाजीनगर येथे ‘डायग्नोपिन’च्या नवीन शाखेचा भव्य शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर, दि. 19:- शहरातील नागरिकांसाठी अत्याधुनिक व परवडणाऱ्या दरात डायग्नॉस्टिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘डायग्नोपिन’च्या नवीन शाखेचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला.

या शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री श्री अतुल सावे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

 

‘डायग्नोपिन’ आज महाराष्ट्रातील डायग्नॉस्टिक क्षेत्रात एक विश्वासनीय नाव म्हणून ओळखले जाते. संस्थेचे एकच उद्दिष्ट आहे — सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, जेणेकरून प्रत्येकाला वेळेवर योग्य निदान व उपचार मिळू शकतील. अनेकदा आर्थिक अडचणींमुळे लोक तपासण्या टाळतात आणि त्यामुळे गंभीर आजारांचे निदान उशिरा होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘डायग्नोपिन’ सातत्याने प्रयत्नशील आहे

या नव्या शाखेमध्ये MRI, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, सोनोग्राफी, दंत उपचार, एक्स-रे, ईसीजी यांसारख्या अत्याधुनिक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधुनिक मशीनरी व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तपासण्या करण्यात येणार असून नागरिकांना अचूक व जलद निदान मिळणार आहे.

विशेष म्हणजे, MRI तपासणी सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत फक्त ₹२५०० मध्ये, तर रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत केवळ ₹१९०० मध्ये उपलब्ध आहे. तसेच सोनोग्राफी ₹५०० पासून, डेंटल रूट कॅनल ₹१५०० पासून, शुगर टेस्ट ₹४० पासून, HbA1c ₹३२० मध्ये आणि एक्स-रे ₹३०० मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अत्यंत अल्प दरात दर्जेदार सेवा देण्याचा ‘डायग्नोपिन’चा हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

या उद्घाटन प्रसंगी
श्री.राजेंद्रजी दर्डा
अध्यक्ष सकल जैन समाज,
करणबाबू दर्डा (लोकमत),
समीर राजुरकर, महापौर
शंकर म्हात्रे नगरसेवक,
श्री.पुरुषोत्तमजी दरख़
अध्यक्ष सकल मारवाड़ी महासभा, श्री.ज़ुम्बरलालजी पगारिया
अध्यक्ष स्थानकवासी श्रावक समाज,
श्री अनिल जी संचेती
अध्यक्ष मूर्तिपूजक संघ,
श्री सचिन जी करवा
अध्यक्ष माहेश्वरी समाज ,
श्री कैलाश जी चांदीवाल
पूर्व न्यायमूर्ति हाइकोर्ट ,
श्री पुखराज जी बोरा
पुर्व न्यायमूर्ति हाइकोर्ट,
श्री मीठालालजी कांकरिया
अध्यक्ष महावीर भवन,
श्री सुशील जी भारुका पूर्व अध्यक्ष अग्रवाल समाज, इंदरचंदजी संचेती
वर्धमान श्रावक संघ मंत्री,
श्री गौतमचंद जी संचेती
पूर्व अध्यक्ष भारतीय जैन संघटना ,श्री दयानंदजी मोदानी चेयरमैन महेश को Co op बैंक उद्योजक,
श्री राजेश जी कांकरिया
पूर्व अध्यक्ष सिडको श्रावक संघ उद्योजक ,
श्री विकासजी जैन
पूर्व महापौर,श्री हीरालाल जी भंडारी
ज्येष्ठ श्रावक समाज ,
डॉ श्री प्रकाश जी झांबड
अध्यक्ष सिडको श्रावक संघ, श्री पंकज जी फूलफगर अध्यक्ष गौतमनिधि फाउंडेशन ,श्री विलासजी साहूजी उपाध्यक्ष सकल जैन समाज ,श्री पारस जी तातेड अध्यक्ष दक्षिण मध्य श्रावक संघ,श्री रामेश्वरजी तोतला पूर्व अध्यक्ष वकील महासंघ ,श्री शांतिलालजी सिंगी अध्यक्ष वर्धमान नागरी पतसंस्था,
सतीश ललवाणी,
श्री राजेश जी पाटनी उद्योजक,
श्री आशीषजी कटारिया
उद्योजक,रवि खिंवसरा,
आरुष पारेख,महावीर पाटणी,
अरविंद डोणगावकर ,
किशोर माणकपे ,बबन डिडोरे ,सुनील पवार , विश्वजीत उबाळे तसेच आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘डायग्नोपिन’चे संचालक मितेश कोठारी यांनी उपस्थित मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले. तसेच सतीशजी बनवट यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डायग्नोपिन’ पुढेही अशाच प्रकारे आरोग्यसेवेत योगदान देत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment