पुण्याचे ॲड. प्रकाश बाफना यांची ‘श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स’ च्या राष्ट्रीय प्रांतीय मंत्रीपदी निवड !

पुणे, श्री ऑल ऑल इंडिया श्वेतांबर स्थानवाशी जैन कॉन्फ्रेंरस पंचम झोन चे राष्ट्रीय प्रांतीय मंत्री या पदावर पुण्यातील नामवंत ॲड. प्रकाश बाफना यांची निवड करण्यात अली आहे, ही निवड २०२५ ते २०२७ या दोन वर्षा साठी करण्यात आली आहे.

याबाबतचे पत्र पंचम झोन चे अध्यक्ष श्री नितीन बेदमुथा , प्रांतीय महामंत्री श्री गणेश ओसवाल यांनी त्यांना दिले. प्रकाश बाफना यांचे सामाजिक आणि धार्मिक काम पाहून त्यांची निवड केली आहे.

ते पुणे जिल्हा वकील कल्यान निधीचे आणि जैन सोशल ग्रुप पार्श्व पुणे या संस्थांचे अध्यक्ष असून लायन्स क्लब, जय आत्मानंद ग्रुप यांचे सभासदही आहेत तसेच श्री गुरु गौतममुनी मेडिकल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे ते सेक्रेटरी आहेत.
त्यांचा शपथविधी दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी जैन कॉन्फरन्सच्या पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

Leave a Comment