आनंद पार्श्व गुरुकुल मध्ये डिजिटल बोर्ड अनावरण समारंभ संपन्न !

केडगाव अहिल्यानगर, महाराष्ट्र प्रवर्तक प पू कुंदनऋषीजी म सा आणि संस्कार दिवाकर प पू आलोकऋषीजी म सा.
यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या आनंद नवकार परिवार ट्रस्ट या संस्थेच्या अकोळनेर रोड केडगाव येथील आनंद पार्श्व गुरुकुल या स्कूलमधील नवीन इमारतीमध्ये सुरू झालेल्या पहिली ते दहावी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बोर्ड दानशूर व्यक्तींच्या सहयोगातून बसवण्यात आलेले आहेत. या सात डिजिटल बोर्डाचा अनावरण समारंभ आणि अध्यापन शुभारंभ आज संतांच्या सानिध्यामध्ये लाभार्थी परिवारांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या सात बोर्ड साठी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, उपाध्यक्ष नंदकुमार भटेवरा, सचिव मनोज शेठिया, खजिनदार सीए रवींद्र कटारिया ,श्री भगवानदास गुगळे, श्री प्रतीक पारस चोरडिया, ए यु बँक, स्वर्गीय अरुणकाका जगताप ट्रस्ट, श्री अशोक पारख या परिवारांनी बोर्डासाठी अर्थसहाय्य करून सहकार्य केले. यावेळी गुरुकुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या मान्यवर, दानदाते व लाभार्थी कुटुंबीयांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला.

Leave a Comment