राजस्थान राजवंशला 24 धावांनी हरवून मिळवला ऐतिहासिक विजय !
श्रीलंकेत 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान जीतो अपेक्सतर्फे ‘जेपीएल’चे आयोजन !
कोलंबो, 6 सप्टेंबर : श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या ‘जीतो प्रीमियर लीग’ (JPL) क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या पुणे पेशवाज संघाने राजस्थान राजवंश संघाचा 24 धावांनी पराभव करून ही पहिलीच ऐतिहासिक स्पर्धा जिंकली. पुणे पेशवाज संघाच्या सौरभ शिंगवीने अंतिम सामन्यात 4 षटकात 20 धावा देत 6 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. यामुळे सौरभला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. तर, स्वप्नील गुगळे ने या संपूर्ण स्पर्धेत 7 सामन्यात सर्वाधिक 278 धावा केल्या. त्याबद्दल सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरवण्यात आले.
