शेठ भामाशाह श्री. रमणलालजीसा लुंकड यांचा 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ॠषी आनंद वन,हडपसर Pune संस्थेच्या वतीने वृक्षारोपण !

श्री.रमणलालजी लुंकड यांनी केले 81 व्या वर्षात पदार्पण !

पुणे, हडपसर परीसरात तेरा वर्षांपूर्वी आचार्य भगवंत आनंदऋषी म.सा. यांच्या कृपा आशीर्वादाने उपाध्याय प्रवर पू. श्री. प्रवीणॠषिजी म.सा.यांच्या प्रेरणेने व त्यांच्या सान्निध्यात पुणे शहराच्या अंतर्गत पर्यावरणाचा विचार करून पुणे महानगरपालिका उद्यान विभाग व महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅनॉल च्या बाजूला पडीक असलेल्या सात एकर जागेत 27 नक्षत्राच्या अनुसार नक्षत्र विहार व 24 तीर्थंकरांच्या नावाने तीर्थंकर विहार अशा विविध चारशे वृक्ष डोलत असलेल्या ऋषी आनंद वन मध्ये शेठ भामाशाह श्री. रमणलालजी लुंकड यांच्या पुढाकाराने व त्याच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले, तेरा वर्षानंतर या सर्व झाडांची पूर्णपणे वाढ झाली असून ॠषि आनंदवन मनुष्य प्राणिमात्रांना प्राणवायू हवेत मिसळत जीवनदान देण्याचे केन्द्र म्हणून आज ओळखले जाते हि संकल्पना पू.श्री. प्रवीणॠषिजी म.सा यांची असून यासाठी ॠषी आनंद वन या संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयकुमारजी मर्लेचा,
श्री.प्रमोदजी छाजेड,गुलाबचंदji कवाड, विजय चोरडिया व त्यांचे सर्व सहकारी मित्र परिवार यांचे अतोनात कष्ट व मेहनत असल्याचे दिसून येते.

Leave a Comment