“परवडणाऱ्या दरात मिळणार आरोग्यसेवा “
नाशिक, नाशिक शहरातील मुंबई नाका, सुवोजित डाटामॅटिक्स इमारत,येथे डायग्नोपिन डायग्नॉस्टिक्स या अत्याधुनिक एकत्रित निदान केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ओंकारजी पवार (IAS) यांच्या हस्ते संपन्न झाला.

या केंद्रात अत्याधुनिक निदान सुविधा जसे की एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी (USG), एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
काही वर्षा पूर्वी पुण्यातील वडगावशेरी येथील पहिल्या शाखेसह सुरुवात केलेल्या डायग्नोपिन ने अल्पावधीत महाराष्ट्रातील एक प्रमुख एकत्रित निदान सेवा प्रदाता बनण्याकडे यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.
विशेष म्हणजे, या केंद्रातील सर्व सेवा सवलतीच्या व परवडणाऱ्या दरात रुग्णांना मिळणार आहेत.
एमआरआय तपासणी : दिवसाला फक्त ₹ २५०० व रात्री ₹ १९००
सीटी स्कॅन : केवळ ₹ ९९९
सोनोग्राफी : ₹ ५०० पासून
पॅथॉलॉजी तपासण्या : सरासरी बाजारभावापेक्षा ३०-५०% कमी दरात
तसेच नाशिक येथील शाखे च्या उदघाटन निमित्ताने शुगर, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम, युरिक ऍसिड, थायरॉईड – (टी.एस.एच) या पैकी कोणती ही टेस्ट फक्त ₹10/- मधे केल्या जातील. ही विशेष सवलत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत उपलब्ध असणार आहे.
“सर्वांसाठी परवडणारी व सहज उपलब्ध आरोग्यसेवा” हा डायग्नोपिन चा मुख्य ध्येयवाक्य असून, याची प्रशंसा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. ओंकार पवार यांनी केली.
या सोहळ्यात डायग्नोपिनचे प्रवर्तक तसेच कोठारी कुटुंबातील तीन पिढ्या – श्री. शांतिलालजी, श्री. प्रफुलजी व मितेश कोठारी, तसेच सतीश बनवट,नरेंद्र छाजेड, अभिजीत छाजेड, राजू धरिवाल, डॉ. निलेश लोढा, डॉ. प्रशांत भदाने, महावीर ब्रम्हेचा, प्रेमचंद ताथेड,ताराचंद कुमठ,आदी मान्यवर उपस्थित होते.