मेडीकल कीटचे वाटप संचेती परिवाराचा उपक्रम
पुणे : माऊली माऊलीचा गजर, पांडूरंगाचा जयघोष करत काल रात्रीपासून वारकर्याचे मार्केट यार्डात भव्य स्वागत करण्यात आले.
अभय संचेती म्हणाले की..
ज्यावेळेस वारकरी बंधूचे पुण्यामध्ये आगमन होते, हे पुणेकरांचे सौभाग्यच..आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये आज सुजलाम सुफलाम हे जे ब्रीद वाक्य आहे याला कारण हे शेकडो किलोमीटर प्रवास करतात की जेणेकरून माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगता यावं पाऊस चांगल्या प्रमाणात व्हावा आणि शांततेने प्रत्येकाच्या जीवनमानाचा आनंद प्रत्येकाला मिळावा यासाठी पांडुरंगाच्या जयघोषाने या दिंडीचे आयोजन केले जाते हे खरोखरच परमेश्वर रूपी आगमन असतं असं आम्ही समजतो. आमच्यासाठी मार्केटमध्ये येणारे वारकरी हेच आमच्यासाठी पाडुरंगाचे रूप आहे.
यावेळेस अभय छाजेड, श्रीनाथ भिमाले, अभय संचेती, मानसीताई देशपांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषाताई पाटील, विजय शिंगवी, राजश्री शिळीमकर, मनीष संचेती, रिद्धी संचेती, किरण छाजेड दिंडी प्रमुख विश्वनाथ शेटे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने यावेळी सुमारे तीनशेहून अधिक वारकर्यांना मेडीकल कीटचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मार्केट यार्डातील व्यापार्यांनी मागील दोन महिन्यांपासून दुकानातील माल कमी-कमी करत वारकर्यांसाठी राहण्याची सोय केली होती. अनेक व्यापार्याच्या दुकानात दिंडी मुक्कामाला असतात त्यामुळेच प्रत्येक जण या वारकर्याची सेवा करून पांडूरंगाची सेवा करण्याचे पुण्य कमावत असतो. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, सांयकाळी जेवण, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे, भजन-कीर्तनाचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेक व्यापारी आपल्या नातेवाईकांना देखील वारकर्यांची सेवा करण्यासाठी खास आमंत्रण देवून बोलवत असतात. दिवाळी पेक्षाही जास्त किलबिल या दोन दिवसात मार्केट यार्डातील व्यापार्यांच्या दुकानात पहायला मिळते. यावेळी राजू काग, सुरेंद्र श्रीश्रीमाळ, सचिन गदिया, हरकचंद देसर्डा, प्रवीण नहार, सुरेश वानगोता, संकेत बोथरा, महेश गायकवाड, विशाल चांदणे, सूर्यकांत झेंडे, चंपालाल मुथा उपस्थित होते