पुणे, सालाबादप्रमाणे यंदाही पुण्यानध्ये संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उत्साहात आगमन झालेलेआहे. वारकरी मंडळींचा मुक्काम मार्केट यार्ड येथील गुळभूमार विभागातील मे. राजेंद्रकुमार मोहनलाल आणि कं., मे. चेनसुखलाल माणिकचंद, मे. नविन पेढी, मे. आकाश मार्केट, मे. ओस्तवाल एग्रो प्रॉडक्टस् प्रा. लि., मे. राजेंद्र श्रीमल गुगळे, मे. चंद्रकांत हस्तीमल मुथा, मे. गौतमचंद सुखराज सेटिया, मे. नितीनकुमार आणि कंपनी, मे. भगत एंटरप्रायजेल, मे. गजानन ट्रेडिंग कंपनी, मे. सरस्वती ट्रेडिंग कंपनी, मे. धनलक्ष्मी ट्रेडर्स, मे. जोगमाया सेल्स्, मे. श्री. राघवेंद्र एजन्सी, मे. जवाहरालाल बोथरा आणि कंपनी, मे. श्रेयस ट्रेडर्स, मे. आनंदराम गिरिधारीलाल देसर्डा, में आनंद ट्रेडर्स, मे. रुपचंद उत्तमचंद कोयाळीकर, मे. सतपाल कलीराम अगरवाल, मे. श्री. शगुन सेल्स कॉर्पोरेशन, मे. श्री बालाजी सेल्स्, मे. न्यू सच्चा सौदा पेढी, मे. गावडे आणि कंपनी, मे. चाचा एंटरप्रायजेस, मे. किसनदास पोपटलाल काग, मे. पोपटलाल धनराज दुगड, मे. शिवकैलास ट्रेडिंग कंपनी, मे. महालक्ष्मी मार्केट, मे. रामकृष्ण ट्रेडिंग कंपनी, मे. बी. डी. शिंगवी अॅन्ड सन्स्, मे. एस. एस. सेल्स कॉर्पोरेशन, मे. गुप्ता ट्रेडिंग कंपनी, मे. दलाल महेंद्र शिंगवी, मे. संतोष आणि कंपनी, मे. सत्यनारायण दिपचंद एंड ब्रदर्स, मे मांडोत ब्रदर्स, मे. पारख अँग्रो इंडस्ट्रीज इत्यादी मुमारे ४० सभासदांच्या दुकानात करण्यात आलेला आहे.

सभासदांच्या दुकानात सुमारे १५ हजार भक्त भाविक वारकऱ्यांची चहापाणी, अल्पोपहार, भोजन, स्वच्छतागृहे व रहाण्याची व्यवस्था चोख केली होती. तसेच दुकानातील मालक, दिवाणजी व कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांचे मोठ्या भक्ती भावाने व मनोभावे स्वागत केले. तसेच वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व मोफत औषध देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही मार्केट यार्डातील गुळ व भुसार विभागातील संपूर्ण स्वच्छता, औषध फवारणी, पावडर फवारणी, दोन दिवसांत पुरेसे पाणी पुरवठा, लाईटची व्यवस्था, जेवणे झाल्यानंतर पत्रावळ्या गोळा करण्यासाठी ठिकठिकाणी मोकळ्या कंटेनरची व्यवस्था तसेच मोबाईल स्वच्छतागृहे व चोख सुरक्षा व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच येथील सर्व घटकांतर्फे करण्यात आलेली होती.
वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू उदा. रेनकोट, खाद्यान्न वस्तू, पाण्याच्या बाटल्या, कपडे, आर्थिक मक्त, अशा स्वरुपाची मदत केली आहे. बाहेरुन येणाऱ्या ग्राहकांनीही श्रीसेवेचा लाभ घेतला आहे. मार्केट यार्ड गुळ भूमार विभागात दोन दिवस आनंदी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले. मार्केट यार्डमधील व्यापाऱ्यांच एक अतुट नातं वारकऱ्यांबरोबर निर्माण झाले आहे.
मागील वर्षाप्रमाणे दि पूना मर्वंटस् चेंबरतर्फे मार्केट यार्ड मधील जे अनेक वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत अशा व्यापाऱ्यांच्या दुकानी कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी समक्ष जाऊन त्यांना सन्मानीत केले आहे, अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी दिली.
( रायकुमार नहार)
अध्यक्ष