सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या (SJC) विद्यार्थ्यांची बारावी परीक्षेत १०० टक्के निकालाची १० वर्षाची परंपरा कायम

 १२ वी परीक्षेत सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा  निकाल सर्वोत्तम

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची  बारावीच्या परीक्षेत १०० टक्के  निकालाची स्थापनेपासूनची परंपरा कायम : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया

पुणे, :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या परीक्षेत गुणवत्तापूर्ण  निकालाची परंपरा बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित  सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजने   कायम राखली आहे.  बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या  स्थापनेपासून सातत्याने घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.

सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत पवनी  शार्दूल भिडे हिने ९२. ५०  टक्के गुणांसह प्रथम, संयुक्ता अशोक मोरे हिने ९२.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर चिन्मयी ज्ञानेश रहाणे  हिने ९२ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक, शौनक विजय तिकोटेकर आणि आर्या सुनील बोर्डे यांनी ९१.८३ % सह चौथा क्रमांक , शर्वरी योगेश महाबळेश्वरकर ,रेवा सुनील करंदीकर , निषाद नैनीश लुब्री यांनी ९१. ६७ % गुणांसह पाचवा क्रमांक  पटकावला.

वाणिज्य शाखेत विनीत महेश बंग याने ९१ टक्के गुणांसह प्रथम, प्रसाद काशवी या ने ९० टक्के गुणांसह द्वितीय, तर श्रीम गिरीश पसाद  याने ८५.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. मीनाक्षी राहुल मालेगावकर ८०.३३ % चतुर्थ , श्रीनिवास पांडुरंग दगडे ७९. ६७ % सह पाचव्या स्थानी आला .

कला शाखेत झलक दर्शन गांधी  हिने ९०.५० टक्के गुणांसह प्रथम, शुभश्री विश्वनाथ  हिने ८९.८३  टक्के गुणांसह द्वितीय व शर्वरी मंदार दामले हिने ८७.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. जान्हवी अजयकुमार ८६.६३ % गुणांसह चौथ्या स्थानी तर निखिल संतोष खळदकर ८५.५० % पाचव्या स्थानी आला

विद्यार्थ्यांना रोख रक्कम , प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनी विद्यार्थी, पालकांचे, तसेच  समूह प्राचार्य किरण राव, प्राचार्य वंदना पांडे , विभाग प्रमुख , सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी ‘सूर्यदत्त’ परिवाराच्या च्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या . सूर्यदत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्थापनेपासून बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे . विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नाही तर जागतिक स्तरावर यश मिळवता यावे या करीत त्यांना सर्वानीगीन शिक्षण दिले जाते . त्यांना स्वयं विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात . क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी धवल यश मिळवले आहे  असे मत प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी नोंदविले .

 

 

Leave a Comment