१२ वी परीक्षेत सूर्यदत्त पब्लिक स्कुल (हायर सेकंडरी स्कूल) विद्यार्थ्यांचा 100 % निकाल
सूर्यदत्त पब्लिक स्कुलच्या (हायर सेकंडरी स्कूल) विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेत गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया
पुणे, : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) इयत्ता बारावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी जाहीर झाला . पुणे विभागाचा निकाल ९१.३२ % लागला .यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा दहा दिवस लवकर घेण्यात आली होती. ही परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत सुरळीतपणे पार पडली होती. यावर्षी राज्यभरातून तब्बल १५ लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
या बारावीच्या परीक्षेत गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचालित सूर्यदत्त पब्लिक स्कुलने कायम राखली आहे. बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून सातत्याने घवघवीत यश संपादन करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
सूर्यदत्त पब्लिक स्कुलमध्ये विज्ञान शाखेत हर्ष रुपेश भुरे या ने ९४. ३३ टक्के गुण मिळवून प्रथम, रेहान शकील सय्यद या ने ९१.८३ टक्के गुण मिळवत द्वितीय, तर श्रुतिका संतोष निगडे हिने ९१.५० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक , सिद्धांत सचिन आडमुठे ९०. १७ % सह चतुर्थ तर अदिब सर्फराज मुल्ला व अन्विता आदित्य जोशी ८९.५0 % गुणांसह पाचव्या स्थानी आले .
वाणिज्य शाखेत अनुष्का अजय कुमार हिने ८९.६७ टक्के गुण मिळवत प्रथम, तनिषा अमर जोशी हिने ८९ टक्के गुण मिळवत द्वितीय, सुहानी दीपक चुग यांनी ८८. ५० टक्के गुण , आर्या अमोल लाड ८७.५० % गुणांसह चतुर्थ तर अदविता प्रसाद मेनन हिने पाचवा क्रमांक पटकावला.
कला शाखेत शरण्या चक्रवर्ती हिने ८८. ८३ टक्के गुणांसह प्रथम, फिओना तेजस बखई हिने ८७.५० टक्के गुणांसह द्वितीय व सावनी उदयन भोरकर हिने ८७. १७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक तर राधा निलेश कडू ८६.६७ % गुणांनी चतुर्थ तर अद्वैत ऋषिकेश उत्पात याने ८५.५० % गुणांसह पाचवा क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांना रोख रक्कम , प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे .
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहायक उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांनी विद्यार्थी, पालकांचे, तसेच समूह प्राचार्य किरण राव, विभाग प्रमुख , सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. निकालातील सातत्य अभिमानास्पद असून , शिक्षक व विद्यार्थ्यांतील परस्पर संवाद आणि साद प्रतिसाद यामुळे सर्वोत्तम कामगिरी शक्य होत आहे , गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच व्यक्तिमत्व विकास, प्रोत्साहन, वैयक्तिक मार्गदर्शनासह पूरक गोष्टी उपलब्ध करून दिल्या. या दोन वर्षात विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत जीवनाची मूल्येही शिकविण्यात आली. विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला असे मत प्रा डॉ संजय बी चोरडिया यांनी नोंदविले . विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी ‘सूर्यदत्त’ परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांना भविष्यात लागणारे मार्गदर्शन, सहकार्य सूर्यदत्त नेहमीच करत राहील , असे आश्वासनही त्यांनी दिले.