वाशिम, भारताच्या भूमीसह संपूर्ण जगात सामूहिक नवकार महामंत्र जप दिवसानिमित्त शहरातील ड्रीमलैंड सिटी स्थित श्री वर्धमान जैन स्थानक येथे गुरुवार ९ एप्रिल रोजी सकल श्वेतांबर जैन समुदायाच्या वतीने नवकार महामंत्र जप उत्साहात साजरा करण्यात आला.
कोटा संघ प्रमुख प.पू.श्री प्रकाशकंवरजी म.सा.यांची सुशिष्या जिनशासन प्रभाविका दक्षिण यशस्विनी प.पु.चैतन्याश्रीजी म.सा.,प.पु.जिज्ञासाजी म.सा.,प.पु.सुबोधिजी म.सा.,प.पु.निर्मितिजी म.सा.आदी ठाणा ४ यांची उपस्थिती होती.जैन स्थानकमध्ये आयोजित सदर सामूहिक नवकार महामंत्र जप कार्यक्रमात जैन,अजैन बंधनवांसह सकल श्वेतांबर जैन समाजातील श्रावक श्राविकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.नवकार महामंत्रात संपूर्ण जगातील अरिहंत देव,सिद्ध देव,आचार्य भगवंत,उपाध्याय भगवंत व सर्व साधू साध्वी महाराज यांना नमस्कार,वंदन करण्यात आला आहे.
श्रद्धापूर्वक नवकार महामंत्रचा जप आणि साधना केल्याने मानवाच्या जीवनातील दुःख व कष्टाचे निवारण होऊन आनंद,सुख,शांती,सद्गती तसेच मोक्ष प्राप्ती मिळविता येते.या दृढ श्रद्धेतून संपूर्ण जगात शांतता नांदावी,सलोखा रहावा या उदात्त हेतूने दरवर्षी ९ एप्रिल रोजी नवकार महामंत्र जपचे सर्वत्र आयोजन केल्या जाते.
या अनुषंगाने वर्धमान जैन स्थानक येथे आयोजित सामूहिक नवकार महामंत्र जप सोहळा उत्साहात पार पडला.याप्रसंगी श्री वर्धमान स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष शीतल कुमार गेलडा,श्री संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिराचे अध्यक्ष मनीषकुमार संचेती,वरिष्ठ स्वाध्यायी सुभाषचंद्र सुराणा,वसंतलाल वोरा,चंपालाल चौधरी,कांतिलाल बोरा,शांतीलाल मालिया,प्रेमचंद खटोड यांच्या सह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन डॉ.संजय वोरा यांनी केले