लोनावळा येथील जैन स्थानकामध्ये आचार्य श्री आनंद ॠषिजी म सा यांचा १२५ वा जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी प. पू. ज्ञानप्रभाजी म. सा. यांच्या सान्निध्यात संपन्न !

डॉ अशोककुमार पगारिया यांनी विशद केले, आचार्यश्रीं चे सर्वच क्षेत्रातील योगदान !

लोनावळा येथे जैन स्थानकांमध्ये प पू ज्ञानप्रभाजी म सा यांचा चातुर्मास संपन्न होत आहे. राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषिजी म सा यांचा १२५ वा जन्मोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे माध्यमातून संपन्न झाला, यावेळी महासती जी आणि उपस्थित प्रमुख अतिथी यांनी आचार्य आनंद ॠषिजी म सा यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.

डॉ अशोककुमार पगारिया (राष्ट्रीय अध्यक्ष हर प्रांत जैन भवन समिती, जैन कॉन्फरन्स) यांनी आचार्य आनंदॠषिजी अध्यात्मिक शैक्षणिक,सामाजिक, आणि आरोग्य क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देणारे महान संत होते. त्यांना जैन आणि जैनेतर समाजात भगवान मानतात . त्यांना राष्ट्रसंत उपाधिने महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले .त्यांच्यासारखे संत समाजासाठी शक्तीपीठ, ज्ञानपीठ आणि संस्कार पीठ असतात ” असे प्रतिपादन केले.

या वेळी खालील महानुभावांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.प्रामुख्याने जैन कॉन्फ्रेंस ,जैन कॉन्फ्रेंस चे विश्वस्त रमणलाल लुंकड ,सिध्दाचलमचे अध्यक्ष मोहनलाल संचेती, , सुमतिलाल कोठारी, विजय मरलेचा , प्रवीण लुनावत, प्रवीण बोरा, पी एम जैन, नितीन छाजेड आदि मान्यवर उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष कांतीलालजी ओस्तवाल यांनी स्वागत केले डॉ अमृता सुराणा ह्यांनी सुत्रसंचलन केले व .लोनावळा जैन श्रावक संघाचे पदाधिकारी व युवक मंडळ महिला मंडळ यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Leave a Comment